भुसावळात ह भ प मनोज महाराज यांच्या रसाळ वाणीतून संगीतमय भव्य शिवपुराण कथा सोहळयाचे आयोजन :


भुसावळ – येथील न्यू हुडको कॉलनी मध्ये संगीतमय भव्य शिवपुराण कथा सोहळाचे आयोजन* करण्यात आलेले आहे
कथा प्रवक्ते ह भ प मनोज महाराज ओझरखेडा ता भुसावळ हे आहेत दैनंदिन कार्यक्रमांमध्ये काकडा आरती व विष्णुसहस्रनाम सकाळी 5 ते 7, शिवपुराण कथा सकाळी 10 ते 12 आणि रात्री 7 ते 10 व हरिपाठ संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत होणार आहे
शिवपुराण कथेमध्ये सजीव देखाव्याचे आयोजन सुद्धा मंडळातर्फे करण्यात आलेले आहे
17 ला सकाळी 10 ते 12 ला चंचुला बिंदूत ब्राह्मण कथा
संध्याकाळी 7 ते 10 ला
शिवलिंग निर्मिती कालभैरव देखावा
18 ला सकाळी 10 ते 12 ला
नारदाला मर्कटमुख प्राप्ती गर्वहरण कथा
संध्याकाळी 7 ते 10 ला
दक्षराज सतीदहन देखावा
19 ला सकाळी 10 ते 12 ला
हिमालय आणि मेनका पार्वती जन्म
संध्याकाळी 7 ते 10 ला
शंकर-पार्वती विवाह
20 ला सकाळी 10 ते 12 ला
कार्तिक स्वामी जन्म , तारकासूर वध
संध्याकाळी 7 ते 10 ला
गणपती जन्म, शंकरा सोबत युद्ध ,गजमुख प्रधान देखावा
21 ला सकाळी 10 ते 12 ला
जालंदर जन्म ,विष्णू जालंधर युद्ध , तुळशी शंखचूड वध
संध्याकाळी 7 ते 10 ला
नंदी अवतार , हनुमान देखावा
22 ला सकाळी 10 ते 12 ला
12 ज्योतिर्लिंग कथा प्रारंभ सोमनाथ, मलिकार्जुन,महाकालेश्वर ओंकारेश्वर,अमलेश्वर
संध्याकाळी 7 ते 10 ला
केदारेश्वर , भीमाशंकर , काशी विश्वनाथ , त्रंबकेश्वर , परळी वैजनाथ ,रावण पार्थी लिंग देखावा
23 ला सकाळी 10 ते 12 ला
औंढा नागनाथ , रामेश्वर लिंग , रामेश्वर
संध्याकाळी 7 ते 10 ला
काली गौरी प्रगटन , शुंभ – निराभ वध देखावा
न्यू हुडको कॉलनी मित्र मंडळातर्फे रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम होणार आहे
24 ला सकाळी 11 ते 1 पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे व संध्याकाळी 4 ते 7 ला दिंडी सोहळ्याचे आयोजन व काल्याचे किर्तन होणार आहे. तरी सर्व भाविकांनी कथा श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा असे दीपक धांडे , शहर प्रमुख (शिवसेना उद्धव ठाकरे गट) व न्यू हुडको कॉलनी मित्र मंडळ यांनी केले आहे