सावदा पालिका कार्यालयीन अधीक्षक सचिन चोळके यांना मारहाण …. कर्मचाऱ्यांचे काळी फीत लाऊन काम बंद आंदोलन

सावदा –

सावदा येथील नगर पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक सचिन चोळके हे आपले काम करत असताना यांना दिनांक १४ रोजी आकाश बोयत नामक माथेफिरू व्यक्तीने शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आज दिनांक १५ रोजी सर्व पालिकेचे कर्मचारी यांनी काळी फीत लावून सकाळी दहा वाजेपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. या काम बंद आंदोलनात सर्व विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहे. मारहाण करणाऱ्या आकाश दीपक बोयत याच्यावर त्वरित कारवाई व्हावी यासाठी हे आंदोलन पुकारले असून या आंदोलनात सचिन चोळके. विशाल पाटील. चेतन पाटील. विमलेश जैन. भारती पाटील.अरुणा चौधरी. अविनाश पाटील. मनोज चौधरी. सतीश पाटील. हिरामण पाटील. संदीप पाटील. धीरज बनसोडे. विनय खक्के. अरुण ठोसरे. राजेंद्र मोरे. सुरेश चौधरी. आकाश तायडे. जितेश पाटील. अविनाश गवळे. विजय चौधरी. बबन तडवी. हमीद तडवी तेजस वंजारी.चंदू धांडे कर्मचारी सहभागी आहे.