आ. संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राशी ग्राहक सेवा केंद्रातर्फे डिजिटल रेशनकार्ड शिबिराचे आयोजन :

भुसावळ- भुसावळ मतदार संघाचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राशी ग्राहक सेवा केंद्र, भाजप कार्यकर्ते प्रा.धीरज पाटील व भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्यातर्फे परिसरातील शिधापत्रिकाधारक ग्राहकांसाठी रविवारी डिजिटल रेशनकार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना क्यूआर कोड आधारित ई-शिधापत्रिका ऑनलाइन तसेच डाऊनलोड करण्याची सुविधा रविवार, दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वा. ते दुपारी १२ दरम्यान उपलब्ध करण्यात आली आहे. प्राशी ग्राहक सेवा केंद्राचे तसेच शिबिराचे उदघाटन भुसावळ मतदार संघाचे आमदार लोकप्रिय संजय सावकारे करणार आहेत. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, शहराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेविका अनिता सपकाळे, महिला आघाडी शहराध्यक्षा अनिता आंबेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी, भारतीय जनता पार्टीचे आजी- माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत डिजिटल रेशनकार्डचे वाटप करण्यात येईल.