भुसावळात मोटार सायकल चोर पोलीसांच्या ताब्यात


भुसावळ – येथील मामाजी टॉकीज परिसरात राहणारी सीमा रविंद्र पाटील यांची होंडा एलेव्हेटर गाडी प्रीमियर हॉटेल लगतच्या दवाखान्या समोरुन चोरीला गेली होती . याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती
सदर गाडी गवळी वाडयातील मेघराज चंदू भोई वापरत असल्याची माहीती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली त्यांनी लागलीच पोलीस उपनिरिक्षक हरीष भोये , मंगेश जाधव , पोहे कॉ रमण सुरळकर , निलेश चौधरी , उमाकांत पाटील , प्रशांत परदेशी , समाधान पाटील , योगेश माळी अमर आढाळे आदींनी आरोपीस अटक केली असून मोटार सायकल ताब्यात घेण्यात आली आहे .