भुसावळ : येथील अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे ममता फाउंडेशन अध्यक्षा नूतन फालक यांना भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या सन्माननीय मान्यवरांना भारत भूषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सामाजिक कार्याची दखल
रोटरी क्लब ताप्ती व्हॅलीच्या माजी अध्यक्षा असतांना तसेच ममता फाउंडेशनच्या माध्यमातून नूतन फालक यांनी कोरोना काळात गोर गरीब व गरजू नागरिकांना मदत केली तसेच गरजू, गोरगरीबांना अन्न, कपडे व इतर जिवनावश्यक साहित्याचे वाटप केले आहे.तर अनेकांना नेहमी संकट समयी मदत करणे
या कार्याची संस्थेच्या अध्यक्षा जयश्री इंगळे यांनी
दखल घेतली .
उद्योजक मनोज बियाणी, सौ संगीता बियाणी , माजी गटविकास अधिकारी तायडे , रिपाइंचे राजू सूर्यवंशी , संस्थेच्या अध्यक्ष जयश्री इंगळे , यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सौ नूतन हिरामण फालक यांना गौरवण्यात आले. याबद्दल ममता फाउंडेशनच्या सर्व सदस्या सह मित्र परिवाराने त्यांना शुभेच्छा दिल्या आहे .


