वरणगावला किरकोळ कारणावरून हाणामारी तीघ जखमी परस्पर गुन्हे दाखल : पाच पोलीसाच्या ताब्यात

वरणगाव – शहरातील विकास कॉलनी व गौसीया नगर मधील तरुणांमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या हाणामारीत तीघ जखमी झाले असून एकामेका विरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असून पाच पोलीसानी ताब्यात घेतले आहे

या बाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की शहरातील विकास कॉलनी मधील रहिवाशी शेख मजहर शेख मस्जिद यांचे पुतणे व विकास कॉलणी मधील रहिवाशी असलेल्या तरुणांशी दि १८ शनिवार रोजीच्या सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास शादी हॉल जवळ किरकोळ कारणावरुन वाद झाल्या होता तो काही प्रतिष्ठीत नागरिकाच्या मध्यस्थीनी मिटविण्यात आला होता मात्र त्यातील एकाने तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिल्या नंतर दि २४ शुक्रवार रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शेख मजहर शेख मस्जिद हे यांच्या घरात परिवारवारासह बसलेल असताना दानेसअली मुजाहिद अली सैय्यद उर्फ आप्पा , आकीब अली कमरअली सैय्यद , जुबेर अली सैय्यद उर्फ माया , अझहर रहिम शेख उर्फ मोटा , अझरअली तय्यबअली सैय्यद उर्फ अजुबा , शे ऐयसान उर्फ डॉक्टर , इरफान अली आशिक अली उर्फ लुड्या , नजीरअली वजीरअली सैय्यद , फिरोज शकील शेख , जाकीरअली वजीरअली उर्फ जक्को , जुनेदअली जाकीरअली उर्फ खड्डा , सर्व राहणार गौसीया नगर यांनी लाकडी दांडका , लोखंडी रॉड हातात घेऊन इनको जिद्दा नही छोडणेका ! मारो सालोको असे म्हणत घरातील पुतण्या फरहान अशयाना व सहेर बानु , मुस्ताक शेख यांना घरातून ओढत ताणत बाहेर आणून जिवे ठार करण्याच्या उद्देशाने मारहाण करून जखमी केले तर त्यांच्या दोन वर्षाच्या मुलीला जमीनीवर आपटून घरावर दगडफेक करीत तेथुन निघुन गेले या वरील मारहाण करणाऱ्या संशीयत विरोधात भादवी कलम ३०७ , १४४ , १४६ , १४७ ‘ १४८ , १४९ ३२४ , ३२३ , ३३७ , ४५२ , १०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर गौसीया नगर मधील रहिवाशी जुबैरअली जाकीरअली सैय्यद यांच्या चुलत नवाजअली नजरअली सैय्यद यांचा काही दिवसा पुर्वी किरकोळ वाद झाला होता तो ही मिटविल्यात आला होता मात्र त्याच दिवशी विकास कॉलणीतील गौसपाक बाबाच्या नियाज भंडाऱ्या कार्यक्रमक होता त्यावेळी त्या कार्यक्रमला उद्देशुन फरहान शे समीर यांने ऐ मंडप किसीके मौतका है क्या असे मोबाईल वर स्टेटस लावून भावना दुखावल्या होत्या मात्र इतरानी समाजातील वरिष्ठानी सदर मोबाईल वरील स्टेटस काढून टाकण्याचे सांगून आपआपल्या घरी निघुन गेला तर याच गोष्टीचा मनात राग धरून जुबैतअली जकीरअली सैय्यद व अकीबअली कमरअली , हे दोघे कार्यक्रमाच्या मंडपात उभे असताना फराहन व त्याच्या सोबत त्याचे मित्र अरबाज सैय्यद जाकीर सैय्यद उर्फ पहेलवान , अज्जू शे मजीद , समीर शे मजीद , उर्फ टेलर , मजहर शे मजीद , फैजान शे समीर , मुजाहीद सैय्यद साबीर सैय्यद उर्फ मज्जू इंजिनिअर , राहील सैय्यद सहीद सैय्यद उर्फ पहेलवान , साहीर सैय्यद शाबीर सैय्यद , मुक्तार शे बशीर , ताबीज सैय्यद सईद सैय्यद , शोयब अंगड्या पुर्ण नाव माहीत नाही यांनी चाकु , लोखंडी रॉड , फायटर , विटा , दगड हातात घेऊन धावत जाऊन लाथा बुक्यानी मारहाण करीत अकीबअली याच्या हातावर वार करून जखमी केल्याने त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जळगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे
याबाबत वरणगाव वरणगाव पोलीसा स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच संशयीताना ताब्यात घेण्यात आले असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी , व उप निरिक्षक किशोर पाटील हे करीत आहे