जखमी नीलगाईच्या पिल्लाचे प्राणीमित्रांनी व चोरवड गावकऱ्यांनी वाचवले प्राण :


भुसावळ – कुत्र्याच्या तावडीत सापडलेल्या जखमी नील गाईच्या पिल्लाला प्राणीमित्रांनी व चोरवड गावकऱ्यांनी प्राण वाचवून जीवनदान दिले .

चोरवड येथील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर नीलगाईंचा कळप असतो .
जंगलात भटकंतीकरत अन्न शोधार्थ एक निलगायीचे पिल्लू कळपामधून रात्री ७ वाजेदरम्यान रस्ता भरकटले व गावात आले असता गावातील कुत्र्यांनी त्या पिल्लाला घेरले वत्यावर हल्ला केला कुत्र्यांनी त्या पिल्लाच्या शरीराचे लचके तोडले गंभीरपणे जखमी केले
दरम्यान चोरवड गावातील मंडळींना हरणाचे पिल्लु वाटल्याने त्यांनी स्वतःच्या जीव धोक्यात घालून पोलीस पाटील सचिन ठाकरे च्या मदतीने त्या पिल्लुला सुखरूप वाचविले व हिरा मारोती मंदीरातील डॉकटरच्या मदतीने उपचार करुन घरी येत असता गावातील मंडळींनी शहरातील गोरक्षक प्राणीमित्र रोहित महाले ना फोन केला
वेळ न गमावता थेट घटनास्थळ गाठत वनविभागाचे गोकुळ चौधरी ,नरेंद्र काळे ,संदीप बारी यांच्याशी संम्पर्क केला असता वनविभाग कुर्हा पानांचे येथे उपचारासाठी नेत डॉ भरत महाजन यांनी उपचार केला व गावक-रांची हिंम्मत कामी आली त्या पिल्लुला जीवदान मिळाले शहरातील दिपक नाटेकर अवनी बहुउद्देशीय संस्था व विजय रायपुरे यांचे देखील आभार मानले
शनिवारी सकाळी नऊ च्या सुमारास बारा नंबर जंगलात त्याला सोडले या उत्कृष्ट कार्याबद्दल चोरवड गावांचे वनविभागाने मानले तसेच प्रत्येक मनुष्य मुकप्राण्यांचा जीव वाचवू शकतो फक्त मनात जिद्द असावी असे वक्तव्य वनविभागाने यावेळी केले .