भुसावळ – येथे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतनिमित्त समाज मंदिरामध्ये बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या पराक्रमाची महती विषद करण्यात आली.

प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. किशोर मोरे हे उपस्थितीत होते. तर सरपंच प्रविण मेश्राम यांनी देखील भगवान बिरसा मुंडा यांनी धर्मपरिवर्तनाचा कश्या प्रकार विरोध केला, व ब्रिटिशांच्या त्रासापासून आदिवासी समाजाची कशी सुटका केली याबद्दल माहिती दिली व समाजाला मार्गदर्शन केले, . तसेच राजाभाऊ गायकवाड यांनी सुद्धा तरुणांना प्रेरणा त्मक विचार व्यक्त केले . कार्यक्रमाचे आभार उपसरपंच योगेश बोरीकर यांनी मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे नहाटा कॉलेज अध्यक्ष दुर्गेश जाधव यांनी केले.यावेळी समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते



