भुसावळ शहरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शाखेचे उद्घाटन :

भुसावळ – भुसावळ शहरात विठ्ठल मंदिर वार्ड भागात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शाखेचे उद्घाटन माजी आमदार दिलीप भोळे यांचे हस्ते
१६ नोव्हेंबर २३ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले आहे .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष समाधान महाजन सर , तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा प्रमुख विधीतज्ञ जगदीश कापडे , यांचेसह सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहणार आहे .
तरी सर्व शिवसेना ,युवा सेना ,महिला आघाडी,रेल कामगार सेना,ग्राहक सेना, शिशक सेना,व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शहर प्रमुख दीपक धांडे यांनी केले