भुसावळ – जळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे आयुक्त कार्यालयाच्या पत्राकडे दुर्लक्ष झाले असून दिवाळीच्या सु्टी बाबत जिल्ह्यातील शाळां संभ्रमात असल्याचे प्रसिद्धी पत्रकानव्ये प्र.ह.दलाल यांनी कळविले आहे .
शिक्षण आयुक्त कार्यालयातील उप संचालक(प्रशासन) पुणे यांनी पत्र क्र. शि आ/२०२३/आस्था/क माध्या ६५८/दिनांक २५/१०/२०२३चया पत्रानुसार दिवाळीच्या सुट्ट्या बाबत राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये यांच्यात समानता येण्यासाठी दिवाळीच्या सुटीच्या कालावधीत बदल करण्यात येत आहे व दिवाळीची सुटी दिनांक ९/११/२३पासून२५/११/२०२३ पर्यंत्रहील असे आदेश केलेले आहे .आणि द्वितीय सत्र २८/११/२०२३ पासून सुरू करण्याचेही निर्देशित केलेले आहे (२६/११रविवार,२७/११गुरुनानक जयंती).मात्र जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी हा बदल सुचविणारे परिपत्रकच न काढल्याने त्यांच्या दिनांक २८/६/२०२३चे पत्र विचारात घेवून दिवाळीची सुटी नेमकी दिनांक९/११/पासून की दिनांक १०/११/पासून द्यायची ह्या संभ्रमात आहेत त्यामुळे राज्यात एक समानता राहावी हा उद्देश तर साध्य होणे दूरच पण जिल्ह्यात देखील समानता राहणार नाही वरिष्ठांच्या पुरेसे आधी निर्गमित पत्रकडे जबाबदार जिल्हा शिक्षणाधिकारी यांचे दुर्लक्ष ही खेदाची बाब आहे असे भा ज पा शिक्षक आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य व ज्येष्ट शिक्षक नेते प्र.ह.दलाल यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे



