भुसावळ – रेल कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या आदेशाने,केंद्रीय सरचिटणीस दिवाकर देव,केंद्रीय कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या प्रेरणेने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांची आज रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने भुसावळ येथे भेट घेतली. यावेळी
त्यांचा भगवा सत्कार केला.
रेल्वे कामगारांच्या ज्वलंत व प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.सर्व योग्य मागण्या लवकरात लवकर सोडवणार असे आश्वासन महाव्यवस्थापक यांनी दिले.यावेळेस डीआरएम इति पांडे ,एडीआरएम एस के सुमन,एडीआरएम कौशलेंद्रकुमार, सिनिअर डीपीओ एन झेड काजी,रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा,कार्याध्यक्ष प्रीतम टाक,संयुक्त सचिव विनोद वाघे,खजिनदार योगेश माळी,एमओएच उपाध्यक्ष मोहन राजपूत,एमओएच सहसचिव राजीवकुमारसिंग हे पदाधिकारी उपस्थित होते.
जीएम ललवाणी यांचे सोबत चर्चेतील विषय
भुसावळच्या डीआरएम कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा वर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविणे , रेल्वे दवाखान्यात वैनटीलेटर, सोनोग्राफी,स्पेशालिस्ट डॉक्टरची भरती,रुग्णांसाठी रेल्वे रिझर्वेशन खिडकी,रक्तपेढीची व्यवस्था करणे , रात्रपाळी पेट्रोलिंग साठी ट्रकमॅनची संख्या वाढवणे , भुसावळ विभागातील सर्व रेल्वे आरक्षण कार्यालया बाहेरील फलक मराठी भाषेमध्ये सुद्धा हवा ,
एमओएचशेडला रनिंग शेडच्या सुविधा देण्यात याव्यात ,10:40 वाले व ऑन रिक्वेस्टवाले व क्लिनरसाठि निवड झालेले ट्रकमन यांना पीओ एच ,सीएमसी ,टीएमडब्ल्यू – एनके आरडी,व इतर रेल्वेत लवकरात लवकर कार्यमुक्त करून त्यांची रवानगी करणे
पॉईंट्समन यांची ड्युटी 12 तासावरुन सरसकट 8 तास करणे
एलडीसीई व जेडीसीई च्या परीक्षा नेहमी घेण्यात याव्यात
वर्कशॉप व शेड येथे २४ तास अम्ब्युलेन्स व्यवस्था करणे
आदी विषयावर मागणी केली असून सविस्तर चर्चा केली .



