राष्ट्रीय नृत्य महोत्सवात भालेराव कुटुंबीयांचे दुहेरी यश :

भुसावळ –
संस्कार भारती नाट्य केंद्र, आगरा,सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार व मिल्टन पब्लिक स्कूल, आगरा यांचे वतीने पंचवीस ते एकोणतीस आक्टोबर 2023 या दरम्यान मिल्टन पब्लिक स्कूल अवधपुरी आगरा या ठिकाणी आयोजित अखिल भारतीय नृत्य महोत्सवात भुसावळ येथील नुपूर कथक डान्स अँकॅडमी च्या नृत्य शिक्षिका चारू भालेराव यांना शिक्षा मनिशी डॉ साधना शर्मा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान राष्ट्रीय ख्याती प्राप्त नृत्य शिक्षिकांना देण्यात येतो. पुरस्काराच्या स्वरूपात उपरण, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.याच सोबत 29 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान वृंदावन येथे श्री गंगा लोककल्याण सेवा संस्थान च्या सांस्कृतिक शाखे च्या वतीने वृंदावन शोध संस्थान क्या नाट्यगृहात बान्सुरी रंग महोत्सव चे आयोजन करण्यात आले होते . त्यात रमाकांत भालेराव व चारू भालेराव यांनी आपले नृत्य सादर केले. त्यांना शाल ,स्मृतिचिन्ह व बांकेबिहारी ची प्रतिकृती देऊन गौरवण्यात आले. याच स्पर्धेत शास्त्रीय नृत्यात लहान गटात नुपूर भालेराव हिला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. यात स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशामुळे भालेराव कुटुंबीयांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.