भुसावळ – मुलांच्या सोयीसाठी व भविष्यात गरज पडल्यास माहित असावे या साठी शासना तर्फे वजन उंची व रक्तगट तपासणी करण्यात यावी असा आदेश आहे. या साठी महिला क्रिडा मंडळ भुसावळ यांनी पुढाकार घेऊन १०० मुलांची तपासणी साठी हे शिबीर घेण्यात आले.
मुलांचे रक्त गट तपासणी साठी चैतन्य आयुर्वेदिक हाँस्पिटल तर्फे लॅब टेक्निशियन प्रवीण ऊगले व किशोर पाटील यशोदा तायडे यांनी रक्तगट तपासणी केली.
या प्रसंगी महिला क्रिडा मंडळ भुसावळ च्या अध्यक्षा आरती चौधरी, किरण चौधरी, स्वाती भोळे, विजया निकम हजर होते.
शाळेचे मुख्याध्यापक अजय फेगडे, रामकृष्ण इतवारे, भावना पाटील, सविता वानखेडे, जयमाला भोळे, हजर होते.



