भुसावळ : दसरा, दिवाळी, छटपूजा यामुळे रेल्वे गाड्यांना होत असलेली लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून 60 उत्सव विशेष गाड्या चालविल्या जात आहे. यामुळे भुसावळसह विभागातून प्रवास करणार्या प्रवाशांची सोय होणार आहे. मध्य रेल्वेतर्फे लोकमान्य टिळक टर्मिनस-थिवी, नागपूर आणि दानापूर दरम्यान अतिरीक्त उत्सव विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. यामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांना या गाड्यांचा लाभ मिळणार आहे.

या रेल्वे गाड्या धावणार
लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या 22 फेर्या होणार आहे. या गाडीला 22 एलएचबी कोच असतील. 01033 द्विसाप्ताहिक सुपरफास्ट विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 26 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात 11 फेर्या होणार आहे. दर मंगळवार आणि गुरुवारी रात्री 8.15 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसर्या दिवशी 10.25 वाजता पोहोचेल तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी 27 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर या काळात 11 फेर्या होणार आहे. दर बुधवार आणि शुक्रवारी 1.30 वाजता नागपूर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी पहाटे 3.35 वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि नागपूर येथे थांबेल. एक प्रथम वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, 15 तृतीय वातानुकूलित, पॅन्टरी कार आणि दोन जनरेटर व्हॅन अशी डब्यांची स्थिती असेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस-थिवि त्री-साप्ताहिक गाडीच्या 26 फेर्या होणार आहे. या गाडीला 21 आयसीएफ कोच असतील. 01129 ट्राय साप्ताहिक लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 1 ते 29 नोव्हेबर या काळात 13 फेर्या होतील. ही गाडी दर शनिवार, सोमवार आणि बुधवारी रात्री 10.15 वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसर्या दिवशी 10 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01130 त्री-साप्ताहिक गाडी 2 ते 30 नोव्हेंबर या काळात 13 फेर्या होणार आहे. ही गाडी दर रविवार, मंगळवार आणि गुरुवारी दुपारी 3 वाजता थिविम येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी पहाटे 4.5 वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि येथे थांबेल. या गाडीला एक प्रथम वातानुकूलित, एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, 9 शयनयान, एक द्वितीय बैठक श्रेणी आणि दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह चार सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर साप्ताहिक एक्स्प्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशलगाडी 01409 साप्ताहिक स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 28 ऑक्टोबर ते 2 डिसेंबर याकाळात सहा फेर्या होणार आहे. ही गाडी दर शनिवारी दुपारी 12.15 वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसर्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी 01410 साप्ताहिक स्पेशल 29 ऑक्टोबर ते 3 डिसेंबर या काळात सहा फेर्या होणार आहे. ही गाडी दर रविवारी दानापूर येथून संध्याकाळी 6.30 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी 11.55 वाजता पोहोचेल. ही गाडी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरीया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडीत दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर येथे थांबेल.


