नाहाटा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी संशोधन प्रकल्प अहवाल मार्गदर्शन कार्यशाळासंपन्न.


भुसावळ, – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्‍य महाविद्यालयात दिनांक 23/10/2023 रोजी वाणिज्य, व्यवस्थापन व अर्थशास्त्र संशोधन केंद आणि वाणिज्‍य व व्‍यवस्‍थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्‍यांसाठी संशोधन प्रकल्प अहवाल मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली. सदर कार्यक्रमाला व्‍यासपीठावर कार्यक्रमाचे अध्‍यक्ष म्‍हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील , कार्यशाळेचे उद्घाटक व प्रमुख वक्ते नाहाटा महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य व वाणिज्य विभागप्रमुख, प्रा. डॉ.एन ई.भंगाळे,उपप्राचार्य डॉ .ए. डी.गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बऱ्हाटे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.ममताबेन पाटील, वाणिज्य, व्यवस्थापन व अर्थशास्त्र संशोधन केंद्राचे समन्‍वयक प्रा.डॉ. रश्‍मी शर्मा उपस्थित
होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ.ममताबेन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख वक्ते, वाणिज्य विभागातील माजी विभाप्रमुख प्रा.डॉ.एन. ई.भंगाळे यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले व आपल्या मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प अहवाल कसा तयार करावा,प्रकल्प अहवालाचे महत्व, विषय निवड, अहवालातील प्रकरण निहाय सर्व मुद्यांची सविस्तर माहिती, प्रकल्प अहवालसाठीची पूर्वतयारी, संशोधनाची उद्दिष्टे, विद्यापीठाने संशोधन प्रकल्प अहवालाची निश्चित केलेली रचने विषयी माहिती, प्रकल्प अहवाल तयार करताना घ्यावयाची काळजी इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. तसेच प्रकल्प अहवालामुळे विद्यार्थ्यांमध्ये संदेशवहन कौशल्ये, विश्लेषण क्षमता विकसीत होते व विचार शक्तीला प्रोत्साहन मिळते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही.पाटील यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणात प्रकल्प अहवाल या विषयाचे महत्त्व, या मुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन साठीची आवश्यक कौशल्य विकसित होतात. तरी विद्यार्थ्‍यांनी संशोधन संबंधी आयोजित करण्‍यात येणा-या अशा विविध कार्यक्रमामध्‍ये सहभाग घेवून आपल्‍या सुप्‍त गुणांना चालना देण्‍याविषयी प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनिया टेकवाणी यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. रश्मी शर्मा यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य प्रा.डॉ एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ .ए. डी. गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वाणिज्य विभागातील प्राध्यापक प्रा. डॉ.के .पी पाटील,प्रा. स्मिता बेंडाळे, प्रा. भूषण चौधरी, प्रा.खिलेश पाटील, प्रा.आकाश तायडे, प्रा. स्वाती शेळके, प्रा.जयश्री चौधरी, प्रा.सपना जंगले, प्रा.हेमंत सावकारे, प्रा .एकता बजाज, प्रा ललिता पाटील, श्री.त्रिविक्रम वारके यांनी या कार्यशाळेच्या यशस्वीते साठी परिश्रम घेतले.