प्रसिद्ध कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे आज दिनांक २६ गुरुवार रोजी
निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे जेष्ठ कीर्तनकार म्हणून जगभरात त्यांचं नाव आहे. महाराष्ट्राच्या गावागावात त्यांचे कीर्तन ऐकले जायचे. महाराष्ट्राच्या खोपड्यांपर्यंत घराघरात कीर्तनाची गोडी त्यांनी लावली . आज त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी नेरुळ येथील त्यांच्या गावी अखेरचा श्वास घेतला

. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती मिळत आहे. बाबा महाराज यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.
पार्थिवावर २७ रोजी अंत्यसंस्कार
बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवर उद्या २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यात, बाबा महाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी ३ वाजेनंतर अंतिम दर्शनासाठी नेरुळ जिमखान्यासमोर असलेल्या विठ्ठल रुख्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे.
बाबा महाराज सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंत शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतलं. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपूर्वी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना कीर्तनासाठी उभं राहता येत नसल्याने त्यांचे नातू यांनी ही धुरा स्वतः खांद्यावर घेतली असून कीर्तनाची व वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे चालवत आहे.


