भुसावळात पुन्हा गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुस हस्तगत –


भुसावळ – शहरातील नाहाटा चौक,पाण्याचे टाकी जवळ गुन्हयाचे उद्देशाने हातात पिस्टल घेऊन संशयितरित्या फिरणारा राहुल क्षिरसागर याला पोलिसांनी जेरबंद करून त्याच्या ताब्यातून गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुस ताब्यात घेतले आहे .

याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय माहिती मिळाली की,जामनेर रोड परिसरात राहुल क्षिरसागर हा शस्त्र घेऊन कोणतातरी गांभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पो.नी.बबन आव्हाड याचे आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, सपोनि.मंगेश जाधव,पोहेकॉ.सुनील जोशी, विजय नेरकर, निलेश चौधरी, यासीन पिंजारी, महेश चौधरी,रमण सुरळकर, उमाकांत पाटील, पोकॉ.प्रशांत परदेशी,सचिन चौधरी, योगेश माळी अशांनी सदर इसनांचा शोध घेतला असता नाहाटा चौक,पाण्याचे टाकी जवळ दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने हातात पिस्टल घेऊन संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून आला.पथकाने त्यास ताब्यात घेतले असता त्याचे नाव राहुल रामदास क्षिरसागर (वय ३५) राहणार फडके खानावळ जवळ, अष्टभुजा हॉटेलच्या मागे भुसावळ असे सांगितले.

सदरील संशयितांची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक लोखंडी गावठी पिस्टल मॅगझीन सह दोन जिवंत काडतुस व एक मोबाईल असा मुद्देमाल मिळून आला.सदरील संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयात हजर केले असता (ता.१९) रोजी पावेतो पोलीस कोठडी सूनविण्यात आली आहे.