भुसावळ – सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमिवर पोलीस प्रशासनाने शहरातील श्रींदुर्गा मंडळांच्या पदाधिकार्यांसोबत बैठक घेतली. यावेळी डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे , नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे , बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड शहर पोलीस स्टेशनचे गजानन पडघम , तालुका पोलीस स्टेशनचे बबन जगताप , वाहतूक शाखेच्या रूपाली चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते .
याप्रसंगी डी वाय एस पी पिंगळे यांनी सांगितले की गणपती उत्सवाच्या वेळेला ज्या पद्धतीने मंडळांनी सहकार्य केलं त्याच पद्धतीने शांततेत दुर्गा उत्सव साजरा करतांना मंडळ पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले .
प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले की कोणतीही अडचण असल्यास आम्ही सोडवु आमच्यापर्यंत पोहोचवा काही प्रश्नांची उत्तरे यावेळी प्रशासनाने दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन आव्हाड यांनी केलं तर आभार गजानन पडघम यांनी मानले.


