वीज कंत्राटी कामगारांचा मंत्रालयावर 1 रोजी मोर्चा –

भुसावळ : राज्यातील महावितरण, महापारेषण, व महानिर्मिती कंपनीतील नियमित मंजूररीरक्त पदांवर मागील सुमारे 15 वर्षांपासून सुमारे 15 ते 15 हजार रुपये प्रतिमाह करीत असलेल्या अनुभवी व कुशल वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजंदारी पद्धतीने वयाच्या 60 वर्षांपर्यंत जॉब सिक्युरिटी देऊन सेवेत सामावून घ्यावे अथवा समान काम समान वेतन द्यावे या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा निघणार आहे. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) संघटनेच्या पुणे येथील भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात 7 व 8 ऑक्टोंबर रोजी झालेल्या केंद्रीय कार्यकारीणी बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीसाठी राज्यातील 28 जिल्ह्याचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.

दरम्यान, उर्जा खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटना पदाधिकारी यांची बैठक घेतल्यास या समस्यांवर नक्कीच तोडगा निघेल, असा विश्वास महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे (संलग्न भारतीय मजदूर संघ) प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे व प्रदेश उपाध्यक्ष सचिन भावसार यांनी व्यक्त केला आहे.