नाहाटा महाविद्यालयात मेरी माती मेरा देश कार्यक्रम संपन्न :

भुसावळ – दिनांक 16 सप्टेंबर रोजी भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एकाकाच्या कार्यक्रमाची सुरुवात देशाचे पंतप्रधान. नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार मेरी माटी मेरा देश अंतर्गत अमृत कलश मध्ये माती टाकून करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ . बी.एच.बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. ए.डी.गोस्वामी, डॉ. सचिन येवले. डॉ.सी.एच. सरोदे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर, डॉ.व्ही.एन. महीरे, डॉ. ममताबेन पाटील मॅडम यांनी यावेळेस अमृत कलाशामध्ये मुठ भर माती घेउन त्याचा सेल्फी फोटो घेतला व तो केंद्र सरकारने दिलेल्या लिंक वर अपलोड केला. त्यानंतर पंच प्रण शपथ सर्व उपस्थितांना देण्यात आली. त्यांच्या सोबत सुमारे 78 स्वयंसेवक आणि इतर प्राध्यापक बंधू भगिनी यांनीही मेरी माटी मेरा देश या पंच प्रण कार्यक्रमाला सहभाग नोंदविला.

  या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते. 

सदर कार्यक्रमासाठी रा. से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर, डॉ.व्ही.एन. महीरे, डॉ. ममताबेन पाटील मॅडम यांनी आणि रा.से. यो. विभागातील सर्व कनिष्ठ आणि वरीष्ठ स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.