- भुसावळ - तालुक्यातील हतनुर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आले आहे .
तापी नदीकाठच्या गावांना सतत त्याचा इशारा देण्यात आला आहे .
जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांनी हतनूर धरणावर भेट देवुन परिस्थीतीचा आढावा घेतला आहे व पुढील सुचना दिल्या आहेत पूर परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी ते रावेर तालुक्यात भेट देण्यासाठी गेले असुन प्रशासन अर्लट असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना सांगितले .
तापी व पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तापी नदीच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे
हतनूर प्रकल्प १६ सप्टेबर रोजी सकाळी १० वाजता पाणी पातळी 213 मीटर असुन एकुण पाणी साठा 340 दलघमी म्हणजेच
एकुण पाणी साठा 89 टक्के आहे
४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असुन विसर्ग 9363 क्युमेक्स ने सुरु आहे
तापी नदी दुधडी भरून वाहू लागली आहे
हतनुर धरणाच्या खालील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कोणीही नदीपात्रात जाऊ नये तसेच गुरेढोरे नदीपात्रात सोडू नये असे आव्हान पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे अशी माहिती हतनुर धरणाचे पाटबंधारे अभियंता चौधरी साहेब यांनी दिली आहे



