स्वच्छ रेल स्वच्छ भारत –स्वच्छता पखवाडास्वच्छ जागरूकता : मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीने पथनाट्य सादर :


भुसावळ –
दिनांक 16.09.2023 रोजी स्वच्छता पंधरवड्यांतर्गत स्वच्छ जागरूकता दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या अंतर्गत भुसावळ विभागातील जवळपास सर्व स्थानकांवर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता जागरूकता रॅली काढण्यात आली, त्यानंतर मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर M.P.S. पब्लिक स्कूलतर्फे स्वच्छता या विषयावर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.यासोबतच मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीने पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.बुऱ्हाणपूर व नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यात आले.
BTC (C&W) भुसावळ येथे सेमिनारचे आयोजन करण्यात आले प्रशिक्षणार्थींना स्वच्छता पखवाड्याची उद्दिष्टे व घटकांविषयी वरिष्ठ प्रशिक्षकांमार्फत जागरूक करण्यात आले.डॉक्टरांनी हेल्थ युनिट नाशिकरोड येथे स्वच्छता जनजागृतीपर चर्चासत्राचे आयोजन केले होते.