जेसीआय ‘ भुसावळ ताप्ती क्लबचा स्तुत्य उपक्रम “एक मुट्ठी अनाज ” गोरगरिबांना धान्य वाटप :

भुसावळ/ प्रतिनिधी – जेसीआय ‘ भुसावळ ताप्ती
क्लबतर्फे “एक मुट्ठी अनाज ” कार्यक्रम राबविण्यात आला.
क्लबच्या सर्व सदस्य यांनी आपापल्यापरीने स्वेच्छेने धान्य संकलन केले. एकत्रित धान्य गरजूंना वाटप करण्यात आले. या वर्षीही सर्व सदस्यांनी उत्साहाने या प्रकल्पात सहभाग नोंदवला .
यावेळी भरपूर धान्य एकत्रित झाले.या धान्य चे वाटप मुशाळ तांडा येथील ७६ कुटुंब आणि भिलमळी येथील कुटुंब असे एकूण १०० कुटुंबांना गहू तांदूळ,साबुदाणा,साखर, डाळ व गूळाचे किट देण्यात आले..
कार्यक्रमाचे प्रासताविक अध्यक्षा रजनी सावकारे यांनी तसेच सूत्रसंचालन व आभार मोरे सर यांनी मानले.
उपक्रमाला जयश्री अग्रवाल,ज्योती दरगड,पल्लवी झोपे,सुनीता दरगड,स्मिता बियाणी,संगीता अग्रवाल,डॉ. सोनल जवर,डॉ. मोनिका अग्रवाल,सुचित्रा अग्रवाल यांनी परिश्रम घेतले.