‘

भुसावळ –
भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गणेशाेत्सवाचे औचित्य साधून ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम गणेशोत्सव काळात राबवण्यात येणार आहे. गणेशाेत्सवाच्या खर्चात बचत करून वंचित, गरजू आणि गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करायचे, असा हा उपक्रम आहे.यंदा उपक्रमाचे सातवे वर्ष आहे.
गणेशाेत्सवात वारेमाप हाेणाऱ्या खर्चात बचत करण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी केले जाते. गणरायाला दुर्वा म्हणून शैक्षणिक साहित्य अर्पण करून ते गाेरगरीब विद्यार्थ्यांना वाटप करायचे, असा हा साधा आणि साेपा उपक्रम आहे. यंदा या उपक्रमाचे सातवे वर्ष आहे. गेल्या सहा वर्षांत तब्बल २५ शाळांमध्ये किमान २२५० गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे.भुसावळ, बोदवड, जामनेर, यावल आणि रावेर तालुक्यातील शाळा निवडून हे साहित्य वाटप करण्यात आले. यंदाही ग्रामीण व शहरी भागातील पाच शाळांची निवड करून त्या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.त्यात पाटी, पेन्शील, वह्या, पेन, कंपासपेटी, गणवेश, पुस्तक या साहित्याचा समावेश असेल. अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी या उपक्रमाची मुहूर्तमेढ राेवली आहे. ज्या दात्यांना शक्य असेल त्यांनी उपक्रमात सहभागी होऊन शालेय साहित्य मदत म्हणून संस्थेस देण्याचे आवाहन प्रकल्प प्रमुख विक्रांत चौधरी, प्रकल्प समन्वयक अमित चौधरी आणि सह समन्वयक ललित महाजन यांनी केले आहे.
उपक्रमासाठी योगेश इंगळे, जीवन महाजन, ज्ञानेश्वर घुले, संजय भटकर, प्रदीप सोनवणे, प्रसन्ना बोरोले, समाधान जाधव, अमितकुमार पाटील, राजू वारके, देव सरकटे, भूषण झोपे, निवृत्ती पाटील, प्रा.श्याम दुसाने, राजेंद्र जावळे, शैलेंद्र महाजन, राहुल भारंबे, तेजेंद्र महाजन, कुंदन वायकोळे, हरीश भट, जीवन सपकाळे, सचिन पाटील, प्रमोद पाटील, मंगेश भावे, उमेश फिरके, अध्यक्ष संदीप पाटील परिश्रम घेत आहेत.


