भुसावळ – ओरिसा येथील पुरी येथे दि. सात ते दहा सप्टेंबर २०२३ दरम्यान संपन्न झालेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत भुसावळ येथील नुपूर कथक डान्स अँकॅडमी चे विद्यार्थी नुपूर भालेराव हिला लहान गटात कथक नृत्य मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तसेच किंजल बाऱ्हे हिस सेमी क्लासिकल मध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. पारितोषिक स्वरूपात स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. याच वेळी आयोजित आंतरराष्ट्रीय महोत्सवात रमाकांत भालेराव व चारू भालेराव यांनी कथक नृत्य प्रस्तुत केले.त्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय नृत्य रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. शाल,स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरवण्यात आले. या महोत्सवात विविध देशांतील तसेच भारतातील अनेक राज्यातील कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. अन्नपूर्णा थिएटर, पुरी येथे झालेल्या या कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या यशामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



