वरणगाव –

वरणगावात तिन दिवस चाललेल्या धार्मिक विधीने परमहंस शंकरबाबा महाराज नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सवाद्य व देखाव्याने ग्राम प्रदक्षिणेने सुरुवात झाली.
श्री चिंतामणी गणेश मंदिर, देशमुख वाडा येथे तिन दिवसीय परमहंस शंकरबाबा महाराज नर्मदेश्वर महादेव मंदीरात प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच संपन्न झाला . प्राण प्रतिष्ठेपूर्वी शहरातून सवाद्य व देखाव्याने ग्राम प्रदक्षिणा घालून धार्मिक विधीच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात समस्त शिवप्रेमी, श्री गणेश, श्री स्वामी समर्थ भक्त परिवार उपस्थीत होता.
प्राणप्रतिष्ठा सोहळा दरम्यान, ग्राम प्रदक्षिणासह वृक्षारोपण, स्थापित देवता पूजन, अग्निस्थापना , हवन रुद्राभिषेक, पुर्णाहुतीसह वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडले . असून या नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली असून पंचक्रोशीतील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तर यावेळी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांनी प्राण प्रतिष्ठाच्या धार्मिक सोहळ्याला हजेरी लावून दर्शनाचा लाभ घेतला .
बेल वृक्षांचे केले जाणार रोपण
श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर व शहराच्या विविध भागातील भाविक भक्तांना १०८ बेल वृक्ष रोपांचे वितरण करून त्याचे रोपण तसेच संगोपण केले जाणार आहे. लागवड करण्यात येणाऱ्या बेल वृक्षारोपणाचा दर दोन महीन्यातुन संगोपनाचा आढावा घेतला जाईल असे श्री .नर्मदेश्वर महादेव मंदिराचे निस्स्मीम भक्त अॅड धिरेंद्र देशमुख यांनी सांगितले .


