भुसावळ – प्रवाशांना रेल्वे स्टेशन वर आले कि रोख रक्कम ची गरज असेल तेव्हा त्यांची होणारी अडचण व गैरसोय लक्षात घेवून भुसावळ मंडळातील येणाऱ्या काही रेल्वे स्टेशन वर प्रवाशांसाठी एटीएम ची सुविधा सुरु करण्यात आली आहे यामध्ये भुसावळ रेल्वे विभागातील शेगाव, अकोला , मलकापूर, पाचोरा, बडनेरा,नाशिकरोड, भुसावळ,चाळीसगांव, मनमाड,निफाड,देवळाली, लासलगाव आणि खंडवा या स्ट. स्थानकांवर एटीएम ची सुविधा सुरू करण्यात आली आहे
भुसावळ मंडळातील येणाऱ्या काही रेल्वे स्टेशन वर प्रवाशांसाठी एटीएम ची सुविधा सुरु करण्यात आली आहे. कि जेणेकरून प्रवाशांना रोख रक्कम काढण्याची अधिक पणे सोय मिळू शकेल. प्रवाशांना रेल्वे स्टेशन वर आले कि रोख रक्कम ची गरज असेल तेव्हा ते या सुविधेंचा वापर करतील . या अनुषंगाने रेल्वे द्वारा हिटाची सर्व्हिस लिमिटेड कंपनी च्या माध्यमातून हि सुविधा भुसावळ मंडळातील काही स्टेशनवर देण्यात येत आहे.

हिताची सर्व्हिस लिमिटेड कंपनी (Hitachi Payment Services) हि ५ वर्षासाठी हि सुविधा देणार आहे. त्यामाध्यमातून रेल्वेला ११.४१ लाख रुपयाचा महसूल प्राप्त होईल.
शेगाव, अकोला , मलकापूर, पाचोरा, बडनेरा,नाशिकरोड, भुसावळ,चाळीसगांव, मनमाड,निफाड,देवळाली, लासलगाव आणि खंडवा या स्टेशनवर एटीएम ची सुविधा देण्यात येत आहे.


