भुसावळ (प्रतिनिधी ) -येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे आज गोस्वामी तुलसीदास जयंती साजरी करण्यात आली .कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ ए डी गोस्वामी होते .

हिंदी विभाग प्रमुख प्रा . डॉ . मनोज पाटील प्रमुख पाहुणे होते . कार्यकमाचे प्रास्ताविक डॉ प्रियंका महाजन यांनी केले . उपप्राचार्य डॉ ए डी गोस्वामी यांच्या हस्ते गोस्वामी तुलसीदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला . यानंतर विद्यार्थ्यांनी गोस्वामी तुलसीदास यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली . हिंदी विभाग प्रमुख डॉ . मनोज पाटील यांनी गोस्वामी तुलसीदास हे एक दर्शनीक साहित्यकार असून त्यांनी रामचरितमानस , संस्कृत रामायण या पुरातन पौराणिक ग्रंथाची रचना केली असून या ग्रंथाबाबत सखोल माहिती देण्यात आली . प्रा कविता पांडव यांनी सुत्रसंचलन केले . तर प्रा डॉ राजेंद्र तायडे यांनी उपस्थितांचे आभार मानले . यावेळी साक्षी वाघरे, काजल चौधरी, भूमिका पाटील, निखील जाधव,अलीशेख कमील आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .


