भुसावळात वाल्मिक नगरात गोळीबार ; एकास अटक ! –

भुसावळ – शहरातील जामनेर रोड वाल्मिक नगर परिसरात एकाने रात्रीच्या सुमारास गोळीबार केल्याने बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना येथे घडली .

येथील वाल्मिक नगर परिसरात गल्लीमध्ये मोकळ्या जागेत

(ता. २३) रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास विकेश श्याम सारवान उर्फ विक्की किशोर टाक ( वय ४२) हा आपले कब्जात विना पास परवाना पंचवीस हजार रुपये किंमतीच्या एक लोखंडी गावठी पिस्टल बाळगून होता त्याने रात्री दोन वेळा हवेत गोळीबार केला . खबर मिळताच त्वरित

घटनास्थळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पोहचून संशयित आरोपी यांस ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल सहीत रिकामे दोन काडतूस जप्त केले आहेत. तसेच संशयित आरोपीस अटक करण्यात जाती आहे

उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक. बबन आव्हाड यांच्या आदेशावरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला पो कॉ सचिन पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये , पोको विजय नेरकर , यासिन पिंजारी, महेश चौधरी, पोकों प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, योगेश माळी यांनी केली आहे