नांदगाव -मनमाड सेक्शन मधे तीसरी लाइन ची चाचणी :


भुसावळ –
मध्य रेल्वेने भुसावळ-मनमाड विभागादरम्यान नवीन 3रा मार्ग बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यापैकी भुसावळ ते पाचोरा विभागादरम्यान नवीन तिसरी लाईनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पाचोरा ते मनमाड विभागादरम्यान उर्वरित नवीन तिसरी री लाईनचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. त्याचा एक भाग म्हणून आज भुसावळ विभागात मुख्य सुरक्षा आयुक्त श्री मनोज अरोरा यांनी रेल्वे लाईन प्रकल्पाच्या चालू असलेल्या नांदगाव -मनमाड सेक्शन मधे आज तीसरी लाइन ची रेल्वे मार्गाची पाहणी केली. बहुप्रतिक्षित प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून, रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीनंतर तो सुरू केला जाईल.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी नांदगाव ते मनमाड स्थानकादरम्यान सुरक्षेशी संबंधित सर्व कामांची पाहणी केली.
रेल्वे वाहतुकीसाठी रेल्वे मार्गाची तपासणीसाठी दोन स्थानकांदरम्यान विशेष गाड़ी 130 च्या वेगाने स्पीड ट्रायल घेण्यात आली.
या चाचणी मध्ये मंडळ रेल प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय , संबंधित शाखांचे चे अधिकारी आणि कर्मचारी हजर होते .
आगामी नवीन तिसरी लाईनची ही पायाभूत सुविधा अपग्रेडची कामे गाड्यांच्या चांगल्या गतीसाठी आहेत आणि ट्रेनचा खोळंबा कमी केला होईल.