भुसावळ विभागातील दुसखेडा स्टेशनवर ट्रॅफिक ब्लॉक


भुसावळ –
दुसखेडा स्टेशन येथे यार्ड रिमॉडलिंग मध्ये अप- डाऊन लूप लाइन च्या कार्यासाठी दिनांक 25.08.2023 ला विशेष ट्रॅफिक ब्लॉक अप डाऊन मार्गावर घेण्यात येणार आहे. हा विशेष वाहतूक ब्लॉक 14.00 वाजल्यापासून ते 17.00 वाजेपर्यंत चालवणार आहे.
वरील कामामुळे मेल एक्स्प्रेस गाड्यांवर खालील प्रमाणे परिणाम-
मार्गात बदल
-22710 आदरा नांदेड एक्सप्रेस ही गाडी इटारसी नरखेड बडनेरा अकोला मार्गे वळवण्यात आली आहे.

वाहतूक ब्लॉक दरम्यान गाड्यांचे रेगुलेशन
अप ट्रेन-:
-12108 सीतापुर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस सावदा स्टेशन येथे तीन तास नियमित केली जाईल..
-22688 वाराणसी मैसूर एक्स्प्रेस निंभोरा स्टेशन येथे 2.55 तास नियमित केली जाईल.
-11072 वाराणसी लोकमान्य टिळक कामायनी रावेर स्टेशन येथे 2.45 तास नियमित केली जाईल.
-15029 गोरखपुर पुणे एक्सप्रेस वाघोडा स्टेशन येथे 2 तास नियमित केली जाईल.
-11058 अमृतसर मुंबई बुऱ्हानपूर स्टेशन येथे 1.30 तास नियमित केली जाईल.
-22537 गोरखपुर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस असिरगढ स्टेशन येथे 1.00 तास नियमित केली जाईल.
-11062 जयनगर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस चांदनी स्टेशन येथे 00.50 मिनिट नियमित केली जाईल.
-19014 कटनी भुसावळ एक्सप्रेस नेपानगर स्टेशन येथे 00.20 मिनिट नियमित केली जाईल.
डाऊन ट्रेन-:
-15017 लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर एक्सप्रेस भुसावळ स्टेशन येथे 2.50 तास नियमित केली जाईल.
-15647 लोकमान्य टिळक टर्मिनस दिब्रुगड एक्सप्रेस भुसावळ स्टेशन येथे 01.55 तास नियमित केली जाईल.
-12534 मुंबई लखनऊ एक्सप्रेस भुसावळ स्टेशन येथे 1.45 तास नियमित केली जाईल.
-22687 मैसूर वाराणसी एक्सप्रेस भादली स्टेशन येथे 01.40 तास नियमित केली जाईल.
-19045 सुरत छपरा एक्सप्रेस जळगाव स्टेशन येथे 1.40 तास नियमित केली जाईल.

या पायाभूत सुविधाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल प्रशासन दिलगीर आहे.
प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी याची नोंद घ्यावी.