जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी रिद्धेश चौधरी व गौरी आहिर यांची निवड

भुसावळ – प्रतिनिधी
सन 2023 24 या शैक्षणिक वर्षाचे अखिल भारतीय विद्यार्थी तालुकास्तरीय विज्ञान मेळावा नुकताच दादासाहेब आर.जी.झांबरे माध्यमिक विद्यालय येथे संपन्न झाला या मेळाव्यात दहा शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेतील दोघांची जिल्हास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड करण्यात आली
दादासाहेब आर.जी.झांबरे माध्यमिक विद्यालय येथे तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा 2023-24 चे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान,मुख्याध्यापक एस.बी.कुमावत ,पर्यवेक्षक एस.डी.बावस्कर परीक्षक डॉक्टर पी एस कोळी सेवानिवृत्त पर्यवेक्षक शशिकांत झांबरे जिल्हा समन्वयक सुनील वानखेडे विषय तज्ञ शिक्षक संजय गायकवाड सचिन पाटील विज्ञान तालुका समन्वयक नीलिमा पाटील विद्यालयाचे समन्वयक प्रशांत वंजारी हे उपस्थित होते. या मेळाव्यात जिल्हास्तरासाठी प्रथम क्रमांकाने के नारखेडे विद्यालय भुसावळ येथील रिद्धेश चौधरी द्वितीय क्रमांकाने श्री शारदा माध्यमिक विद्यालय दिपनगर येथील गौरी आहिर उत्तेजनार्थ महात्मा गांधी विद्यालयातील तोशल तेली यांनी क्रमांक मिळवले
उद्घाटन कार्यक्रमात शिक्षण विस्ताराधिकारी तुषार प्रधान म्हणाले की सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य म्हणून घोषित करण्यात आले यामुळे आपल्या पूर्वजांनी व परंपरेने दिलेल्या अन्नधान्याचा ठेवा पुढच्या पिढीसाठी जपून ठेवला पाहिजे तसेच भरड धान्याचे महत्त्व पटवून देण्याची वेळ आपल्यावरती आली आहे यामुळेच या विज्ञान मेळाव्याचा विषय भरडधान्य अन्न की भ्रम हा विषय ठेवण्यात आला आहे तालुक्यातील विद्यार्थ्यांनी भरडधान्याचा अभ्यास निश्चित केला असेल परंतु ते विचार प्रत्यक्ष जीवनात अमलात आणले पाहिजे
भरड धान्याचे महत्त्व समजून घ्या
आजच्या धावपळीच्या युगामध्ये वेळ कमी असल्याने तरुण पिढी फास्ट फूड सारख्या अन्न सेवनावर भर देते परंतु याचे गंभीर परिणाम कालांतराने दिसू लागतात वेगवेगळ्या व्याधींनी कमी वयातच ग्रासले जातो व शरीर याला साथ देत नाही यामुळे आपण फास्ट फूड चा तयार करून भरड धान्य म्हणजे काय त्याचे फायदे व त्याच्या सेवनाने आयुष्यात होणारे बदल याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे
डॉ. पी एस कोळी पर्यवेक्षक
सदर विज्ञान मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पी.के वंजारी ,जी.एस.सरोदे , के.एम.पाटील वाय.एन.चौधरी , के.व्ही.फालक , तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले