पालिका अधिकाऱ्यांना रहिवासासाठी प्रभाग 22 मध्ये निवास उपलब्ध करून देणार. निवास भाडं आम्ही भरणार– शिशिर जावळे ..भीषण पाणी टंचाई, अपुऱ्यासेवा सुविधा अनुभवण्यासाठी आवाहन..


भुसावळ –अ दर्जा असलेली भुसावळ नगरपालिका हीच पूर्णपणे नागरिकांना आतापर्यंत मुलभूत सेवा सुविधा पुरवण्यासाठी असमर्थ, निष्फळ ठरलेली आहे . गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने भुसावळ नगरपालिकेच्या स्वच्छतेचा प्रश्न असो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, तुटलेल्या गटारी, खराब रस्त्यांचा विषय असो, किंवा स्ट्रीट लाईट चा असो ,मूलभूत सेवा सुविधांचा असो, सातत्याने त्या ठिकाणी नागरिकांना विविध कर भरून देखील वेठीस धरल जातं . त्यांच्या तक्रारींना केराच टोपल दाखवलं जातं.
भुसावळ नगरपालिकेच्या अपुऱ्या मूलभूत सेवा सुविधा आणि गलथान कारभाराची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. आणि वारंवार भुसावळ शहर हे कधी खड्ड्यांचे शहर तर कधी अस्वच्छ शहर तर कधीही पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला रडवून सोडणारे शहर अशी एक ओळख भुसावळ शहराची निर्माण झालेली आहे. भुसावळ नगरपालिकेकडून नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या अपुऱ्या मूलभूत सेवा सुविधांबाबत अनेक आंदोलन झालीत, होत आहेत,अनेक पत्रकार परिषदा होतात .अनेक संघटना या विरुद्ध न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्या अनेक व्यक्ती संस्था सातत्याने त्या ठिकाणी मूलभूत सेवा सुविधांच्या हक्कासाठी न्याय हक्कासाठी लढत आहे. मात्र तरीसुद्धा भुसावळ नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात .टाळाटाळ करतात आणि वेळ मारून देतात . सर्वात महत्त्वाचा आणि अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे तो पाणी प्रश्न एकीकडे भुसावळ शहरांमध्ये दुथडी भरून वाहणारी तापी नदी जी भुसावळ सह आजुबाजूच्या खेड्यापाड्यांना, तालुक्यांना जळगाव जिल्ह्याला वरदान ठरलेली आहे. मात्र त्याच तापीच्या तीरावर वसलेलं भुसावळ शहर पिण्याच्या पाण्यासाठी त्राहि त्राही करत आहे. 365 दिवसांपैकी फक्त 65दिवस भुसावळकर नागरिकाना पाणी मिळतं.भुसावळ तालुक्यातील आजूबाजूच्या खेड्यांमध्ये दर तीन दिवसांनी मुबलक आणि स्वच्छ पिण्याच्या पाणीपुरवठा नागरिकांना केला जातो. मात्र भुसावळ नगरपालिकेकडून नागरिकांना 15 ते 20 दिवसां नंतर तेही अस्वच्छ गढूळ आणि अनियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. भुसावळ नगरपालिकेकडून नागरिकांना तांत्रिक कारण सांगून उडवून लावलं जातं. आणि पिण्याच्या पाण्याची दिवस वाढवले जातात टंचाई निर्माण केली जाते. कधीही यांच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन लिकेज होतात तर कधी यांच्या मोटरी जळतात तर कधी यांचा मोटरीमध्ये गाळ साचतो तर कधी यांच्या यंत्रणा ठप्प होतात.. विशेष बाब म्हणजे नागरिकांना रात्री अपराधी कुठलीही सूचना न देता पिण्याचे पाणी सोडलं जातं महिला भगिनी त्यांचेसंपूर्ण कुटुंबीय अहो रात्री चातक पक्षाप्रमाणे त्या पिण्याच्या पाण्याची वाट बघत जागरण करतात .एवढी रात्र जागरण करून सुद्धा त्यांच्या वाट्याला अक्षदा येतात.. पूर्ण दाबाने स्वच्छ पाणीपुरवठा नागरिकांना मिळत नाही मुबलक पाणी उपलब्ध करून दिले जात नाही. खरंच नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गरज होते का खरं नागरिकांच्या तक्रारीमध्ये तथ्य आहे का ?हे कधीच कुठलाही भुसावळ नगरपालिकेचा अधिकारी स्पॉट व्हिजिट करत नाही .प्रत्यक्ष वस्तू स्थिती बघण्यासाठी त्या त्या प्रभागात त्या त्या एरियामध्ये कधीच जात नाही. भुसावळ नगरपालिकेचे अधिकारी कधीचं अवैध नळ कनेक्शनशोध मोहीम राबवित नाहित. भुसावळ शहरातील काही विशिष्ट भागांना दर तीन दिवसांनी पाणी मिळतं. काही ठिकाणी त्यांच्या ओळखीच्या विशिष्ट लोकांच्या प्रभागांमध्ये परिसरामध्ये मुबलक पाणीपुरवठा केला जातो. पाणी वाटपात सुद्धा भेदभाव होतोच. म्हणून भुसावळ मध्ये पाणी आणि बाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वखर्चाने टँकर विकत घ्यावे लागतात ,मात्र भुसावळ नगरपालिकेकडून प्रभागांमध्ये टंचाईच्या काळामध्ये नियमानुसार कधी मुबलक टँकर सेवेद्वारे पाणीपुरवठा केला गेला आहे का?? भुसावळ पालिकेकडून नगरपालिका अधिनियमानूसार प्रत्येक नागरिकाला दररोज 24 तास पाणी पुरवणे क्रमप्राप्त असताना देखील या नियमाचा भंग सुद्धा सातत्याने होत आहे.
अपुऱ्या मूलभूत सेवा सुविधा मुळे भुसावळकर नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शारिरीक,आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे . हा संपूर्ण भुसावळ शहराचा ज्वलंत प्रश्न आहे . म्हणून एक तरी ओवी अनुभवावी या उक्ती नुसार, ह्या ज्वलंत प्रश्नांचा, अपूर्णमूलभूत सेवा सुविधांचा होणारा त्रास अनुभवण्यासाठी भुसावळ नगरपालिकेच्या प्रशासकांनी अधिकाऱ्यांनी आमच्या प्रभाग 22 मध्ये किमान काही दिवस रहिवासास यावे. त्यांच्या रहिवासासाठी आवश्यक असणारी निवास व्यवस्था भाड्याने उपलब्ध करून देवून त्यांची भाडं आम्ही स्वतः लोक वर्गणीतून भरणार. आमच्या प्रभागापासून अधिकाऱ्यांनी किमान पंधरा दिवस प्रत्येक प्रभागात वास्तव्य करून भुसावळ शहराची खरी वस्तुस्थिती अनुभवावी असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी भुसावळ नगरपालिका प्रशासनास केले आहे..