येवल्यात एसीबी ट्रॅपचा संशय येताच सहाय्यक निरीक्षक चर्तुभुज –

येवला : दाखल गुन्ह्यात 307 चे कलम न वाढवण्यासाठी तसेच पोलीस कोठडी न मिळण्यासाठी तक्रारदाराकडे 50 हजारांची लाच मागितल्यानंतर नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली मात्र येवल्यातील सहाय्यक निरीक्षकाला ट्रॅप आल्याचा संशय आल्यानंतर त्याने धूम ठोकल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री उशिरा येवला पोलीस ठाण्याच्या आवारात घडली. याप्रकरणी दोघांविरोधात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे लाच मागणी प्रकरण
येवला शहर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असून 24 वर्षीय तक्रारदार यांच्या नातेवाईकांविरोधात भादंवि 307 चे कलम न वाढवण्यासह पोलीस कोठडी न घेता सहकार्य करण्याच्या मोबदल्यात सहाय्यक निरीक्षक कुणाल सपकाळे
व पोलीस नाईक सतीश बागुल यांनी 50 हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने या संदर्भात एसीबीकडे तक्रार नोंदवून पडताळणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावणकर यांच्या नेतृत्वात अधिकार्‍यांनी सापळा रचला मात्र आरोपीला संशय येताच तो पोलीस ठाण्यातून पसार झाला तसेच त्याने तक्रारदाराच्या घरी जावून त्याच्या मोबाईलमधील कॉल हिस्ट्री डिलीट केली.

संशय येताच अधिकारी भुर्रर
सोमवारी रात्री उशिरा 12 वाजेनंतरही सहाय्यक निरीक्षक कुणाल सपकाळे यांना आपल्यावर ट्रॅप आल्याचे कळताच त्यांनी सावध पवित्रा घेता व अलगद ते पोलीस ठाण्यात पसार झाले. एसीबीने या प्रकरणी लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या नेतृत्वात हा सापळा लावण्यात आला होता.