कोटेचा महिला महाविद्यालय बोगस शिक्षक शिक्षक भरती प्रकरण.. अंतरिम जामीन अर्ज फेटाळले.

भुसावळ -येथील श्रीमती प .क. कोटेचा महिला महाविद्यालयातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली असून भुसावळ शहर पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहिता कलम 406, 407, 420, 465, 467, 470, 471,व 34 या अन्वये गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणी आपणास अटक होऊ नये म्हणून आरोपींनी भुसावळ येथील ॲडिशनल सेशन कोर्टात अंतरिम जामीन साठी अर्ज केला होता. सदरील जामीन अर्ज फेटाळला गेला असून, सदर बाब ही अत्यंत गंभीर असून न्यायालयाने त्याची दखल घेतली. आरोपीकडून एड .अत्रे व एड.देशपांडे यांनी काम पाहिले तर तक्रारकर्त्या पक्षाकडून एड.भगवती गामोट यांनी प्रखरपणे सदरील जामीन अर्जाला विरोध केला. आरोपींचा शोध सुरू असून सध्या आरोपी कोठे आहेत? याबद्दल तर्कवितर्क आहेत. ह्या बड्या व्यक्ती असल्याकारणाने ते अटकपुर्व जामीन साठी प्रयत्न करतील व अटक टाळण्याचा कसोशीने प्रयत्न करतील.तसेच याप्रकरणी दबक्या आवाजात अशीही चर्चा आहे की अध्यक्ष आणि सचिव यांनी प्रशासन करणाऱ्या व्यक्तीवर पुर्णपणे विश्वासठेवल्यामुळेच ते गोत्यात आलेले असल्याचे समजते.