अमळनेर – जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून विविध प्रकारचे गुन्हे आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.अमळनेर तालुक्यातील वावडे येथे गावठी दारू विक्री करणाऱ्यावर व मांडळ येथे अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यावर मारवड पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील वावडे येथे गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता जवखेडा रस्त्यावर युवराज शामराव भील याला गावठी दारू विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडे ५५ लिटर गावठी दारू विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडे ५५ लिटर गावठी दारू आढळून आली. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा नाश करण्यात आला. मारवड पोलिसात दारूबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल भरत श्रीराम इशी हे करीत आहेत. तसेच मांडळ येथे जिल्हा परिषद शाळेजवळ पान टपरी चालवून अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या दिलीप चव्हाण यांच्यावर तंबाखूजन्य प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करत तंबाखू, सिगारेट, बिडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



