पोलीस अंमलदार यांना”पोलीस स्टेशन एम्प्लॉई ऑफ द मंथ” म्हणून गौरव :


भुसावळ –
उपविभाग अंतर्गत पोलीस स्टेशनमधील पोलीस अंमलदार यांना त्यांचे पोलीस सेवेतील
उत्कृष्ट कामगिरी बद्दल दरमहा बक्षीस देवून गौरव जुलै २०२३ अखेर पासुन नियोजित केले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी दिली .
या अनुषंगाने तालुक्यातील पाच पोलीस कर्मचारी यांना पोलीस स्टेशन एम्प्लॉई ऑफ द मंथ”पुरस्काराने
पोलीस अधीक्षक व सहकारी यांच्यातर्फे गौरविण्यात आले .
एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक, जळगांव व चंद्रकांत गवळी, अप्पर पोलीस अधीक्षक
जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेमध्ये उत्कृष्ट काम करणारे पोलीस अंमलदार यांचे कौतुक करण्यासाठी
तसेच त्यांचेमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी व दैनंदिन कामकाजामध्ये उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा निर्माण
करणेसाठी ” पोलीस स्टेशन एम्प्लॉई ऑफ द मंथ” ही संकल्पना भुसावळ उपविभाग अंतर्गत राबविण्यात येत
आहे. भुसावळ उपविभागातील पोलीस ठाणेकडे . जुलै २०२३ या महिन्यामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या
पोलीस अंमलदार यांची निवड उपविभागातील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे करतील व सदर पोलीस
अंमलदार यांचे नाव “पोलीस स्टेशन एम्प्लॉई ऑफ द मंथ” म्हणुन देण्यात येईल. निवड झालेल्या अंमलदार यांची
उपविभागाकडील क्राईम आढावा बैठकीमध्ये पुष्पगुच्छ व उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमाणपत्र देवुन कौतुक केले तसेच
संबंधीत अंमलदार यांना प्रत्येकी १०००/- प्रोत्सहनपर बक्षीस मिळणे बाबत पोलीस अधीक्षक, जळगांव यांचे
कार्यालयात सादर करण्यात आले आहे. या अंमलदार नाव व फोटो पोलीस ठाणेचे दर्शनी भागावर “पोलीस
” स्टेशन एम्प्लॉई ऑफ द मंथ” या मथळयाखाली प्रदर्शित करणेबाबत नियोजित केले आहे. तसेच उपविभागातील
सर्व ” पोलीस स्टेशन एम्प्लॉई ऑफ द मंथ” मानकऱ्यांचा एकत्रित फोटो उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय
येथील दर्शनी भागात लावण्यात येईल.
या अनुषंगाने ऑगस्ट २०२३ मध्ये दि. १७ ऑगष्ट २०२३ रोजी आयोजित गुन्हे बैठकी दरम्यान पोलीस अंमलदार यांना
“पोलीस स्टेशन एम्प्लॉई ऑफ द मंथ” म्हणून गौरविण्यात आले आहे.
पोलीस अंमलदार यांनी जुलै २०२३ मध्ये केलेली कामगीरी
भुसावळ शहर ,बाजारपेठ , तालुका व नशिराबाद पोलीस ठाणे येथील सहायक फौजदार . अनिल शिवाजी चौधरी , उमाकांत
पन्नालाल पाटील , रशिद
मुबारक तडवी , उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,
भुसावळ लिना मधुकर
खडे , शहर वाहतुक ग्रे. पोउनि.प्रमोद गोपाळ लोणे
यांना पोलीस अधीक्षक यांचे हस्ते गौरविण्यात आले .

क्राईम कामकाज अद्यावत करुन गुन्हे निर्गती मोहिमेत उत्कृष्ट
कामगिरी केल्या बद्दल.
१६ गुन्हे मुदतीत निर्गती, २ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे
कामी विशेष मदत करुन उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल
CCTNS प्रणाली मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल
क्राईम कामकाज अद्यावत करुन गुन्हे निर्गती कामी विशेष मदत
करुन उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल
शहर वाहतुक शाखेचा कार्यभार चांगल्या प्रकारे हाताळुन उत्कृष्ट कामगिरी
केल्या बद्दल या पोलीस कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला .