वर्ड फोटोग्राफी दिनानिमित्त कार्यक्रम :


भुसावळ – येथे दि १९ रोजी सोनिच्छा वाडी मध्ये वर्ड फोटोग्राफी डे निमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
सकाळी १० वा कॅमेरा पुजन करुन शहरातील सर्वात जुने फोटोग्राफर ज्यांनी फोटोग्राफीचा वारसा अजूनही टीकवून ठेवला आहे असे विकास वाणी, सिने फोटोग्राफर विवेक वनीकर,कलात्मक फोटोग्राफर विलास साळी या उत्कृष्ठ सिनियर फोटोग्राफरांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे आयोजक भुसावळ सिनियर फोटोग्राफर गृपचे नरसिंग राठोड,राजेंद्र जावळे,अविनाश साळी,गोकूळ महाजन,श्याम गोविंदा,गणेश राठोड,भरत शिंपी,मुकेश नेवे यांनी कळविले आहे.