स्वातंत्र्य दिवसानिमित्त प्रतिष्ठा महिला मंडळ व जे सी आई यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्तीपर आधारित कार्यक्रम संपन्न : देशभक्तीपर गीतांवर थिरकली जेष्ठांची पावले :

भुसावळ – 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस निम्मित आमदार संजय सावकारे द्वारा प्रायोजित प्रतिष्ठा महिला मंडळ व जे सी आई यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्ती वर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात 8 वर्षा च्या चिमुकली पासून 87 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांनी उत्कृष्ठ सहभाग नोदविला.

देशभक्ती वर आधारित गाणे,नृत्य,मुक नाटिका ,अंगावर शहारे आणणाऱ्या शहीदांचे जीवनपटावरील नाटिका,ज्येष्ठ नागरिकांचे उत्कृष्ठ सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांची मन जिंकली…

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून
खासदार रक्षा खडसे,आमदार संजय सावकारे,बी जे पी जिल्हाध्यक्ष अमोल जावळे,डी वाय एसपी कृष्णात पिंगळे, सी ओ महेश वाधमोडे,मनोज बियाणी, संगिता बियाणी यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सदस्या अनिता आंबेकर,सोनल महाजन,राजश्री बादशाह,वैशाली सैतवाल ,सरला सावकारे,दीपा पटेल,जयश्री चौधरी,वैशाली महाजन,वैशाली भगत,मनीषा काकडे,अलका भटकर,सुनंदा भारुले यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री देशमुख व प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले