भुसावळात महिला क्रिडा मंडळाचा जेष्ठांसह खेळू खेळ , आनंदात घालवू वेळ “,कार्यक्रम संपन्न.

भुसावळ – महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे गुरुदेव जेष्ठ नागरिक संघात विवीध स्पर्धा घेऊन अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात वंदेमातरम या गीताने करून गुरूदेव जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष . प्रकाश विसपुते यांनी महिला क्रिडा मंडळ च्या अध्यक्षा आरती चौधरी व सचिव लता होसकोटे यांना .गजाजन महाराजांचा ग्रंथ देऊन स्वागत केले. तसेच मामा पाचपांडे यांनी महिला क्रिडा मंडळाच्या सर्व मेंबर्सला आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ स्वहस्ते श्री. गजाजन महाराजांचा ग्रंथ देउन कार्यक्रमाचे औचित्य साधले. सचिव महादेव हरिमकर यांनी सुत्रसंचलन केले.
महिला क्रिडा मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून महिला क्रिडा मंडळाच्या कार्याची महिती दिली. तसेच जेष्ठ नागरिकांना सांगितले की तुम्ही आयुष्यभर मुलांसाठी , नातेवाईक, आईवडील, आप्तेष्टांसाठी भरपूर काही केलेले आहे, आता थोडे स्वतः साठी जगा येईल तो क्षण आपला, असे समजायचे. असे सांगितले. नंतर स्पर्धेचे नियम सांगण्यात आले.
यानंतर जयश्री ओक यांनी स्पर्धेचे सुत्रे हातात घेतली. सचिव लता होसकोटे यांनी विवीध गट करून खालील साहित्यिकांची नावे गटाला दिली होती.
कवयित्री बहिणाबाई चौधरी,
पु. ल. देशपांडे
ना. धो. महानोर
कुसुमाग्रज
केशवसुत
मंगेश पाडगावकर या नावाने गट केले होते.
लता होसकोटे , प्राची राणे, मंगला पाटील, कीरण चौधरी, स्वाती भोळे,विनिता नेवे, रश्मी ठोसर यांनी स्पर्धा घेण्यात मदत केली.
यामधे मराठी, हिंदी गाणी,व विविध विषयांवर प्रश्न विचारून जेष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनात्मक स्पर्धा घेतल्या. सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
या नंतर बक्षिसे देण्यात आली विजेते ग्रुप चे मेंबर्स, रामकृष्ण पाटील, एन.के.पाटील, दिनकर जावळे, विजय चौधरी,साधना हरिमकर, सुशीला पाटील यांनी बक्षिसे पटकावले. शेवटी अध्यक्षीय भाषणात प्रकाश विसपुते यांनी महिला क्रिडा मंडळाच्या कार्याचे कौतुक केले व पुन्हा येणाचे आमंत्रण दिले.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने केली. आभार दिनकर जावळे यांनी मानले. संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिव महादेव हरीमकर यांनी केले.
या प्रसंगी महिला क्रिडा मंडळच्या आरती चौधरी
लता होस्कोटे,जयश्री ओक, प्रभा पाटील
प्राची राणे ,कीरण शुक्ला, राजश्री कात्यायनी, अनिता कवडीवाले,मंगला पाटील , स्वाती भोळे, रश्मी ठोसर, किरण चौधरी,विनीता नेवे
वैशाली पाटील, विजया निकम,दिपाली सराफ
हजर होत्या.