भुसावळ – मणिपूर येथे महिलांना विवस्त्र करून त्यांची गावातून नग्न धिंड काढली व नंतर त्यांच्यावर बलात्कार केला या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा येथील माँसाहेब जिजाऊ मराठा महिला मंडळाकडून निषेध करण्यात आला व तसे निवेदन उपविभागीय अधिकारी भुसावळ यांना देण्यात आले
मणिपूर येथील दोन समुदायातील झालेल्या संघर्षातील हिंसाचारात महिलांवर अत्याचार झाला एका समुदायाने दुसऱ्या समुदायातील महिलांवर अत्याचार केला म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी त्या समुदायाने दुसऱ्या समुदायांमधील महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली नंतर त्यांच्यावर अत्याचार केला महिलांचा यात बदला घेण्याचे साधन म्हणून वापर केला गेला महिलांसाठी एवढे कायदे असतानाही त्या सुरक्षित नाही. या कायद्यांची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी देशात महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी असे अत्याचार व दुष्कर्म करणाऱ्या नराधमांना शासन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्थेचे पालन करून अश्यांचा भर चौकात चौरंग केला पाहिजे ज्यामुळे महिलांसोबत असे दुष्कर्म होणार नाही तसेच मणिपूर येथील हिंसाचारात अजून किती महिला अशा अत्याचाराला बळी पडले याची चौकशी व्हावी, महिलांना विवस्त्र करून दिंड करून बलात्कार करणाऱ्या सर्व आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी या निवेदनात केली आहे निवेदन देताना मंडळाचे प्रतिनिधी म्हणून ॲड .जास्वंदी भंडारी (पाटील) , सुरेखा पाटील अनिता ठाकरे, ममता पाटील यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते



