भुसावळ : तालुक्यातील दीपनगर प्रकल्पातून चोरट्यांनी ३ लाख २० हजार रुपये किंमतीचे आठ नग हायड्रोलिक सिलिंडर लांबवल्याने खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे सुरक्षा रक्षक चोहोबाजुनी तैनात असतानाही चोर्या होवू लागल्याने सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दीपनगर प्रकल्पातील मॅकाबर विके प्रा.लि.कंपनीचे स्टोअर्स इंचार्ज सुधाकरसिंग रामअवतारसिंग (४२, लालपूर ठाणा, कोल्हाई, ता.फरांदा महाराज गंज, उत्तरप्रदेश, ह.मु.दीपनगर) यांच्या तक्रारीनुसार, १२ ते १३ जून दरम्यान चोरट्यांनी दीपनगर पॉवर प्लँट क्रशर हाऊसजवळ ३ लाख २० हजार रुपये किंमतीचे आठ नग हायड्रोलिक सिलिंडर ठेवल्यानंतर अज्ञातांनी संधी साधून त्याची चोरी केली. पर्यवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार यांनी चोरी झाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली. तपास एएसआय शामकुमार मोरे करीत आहेत.


