भुसावळात आई व मुलावर कोयत्याने वार ; दोघे गंभीर जखमी :

भुसावळ – शहरातील शनी मंदिर वार्डातील रहिवाशी बेबाबाई लक्ष्मण चौधरी यांच्या राहत्या घरी काही इसमांनी घरात घुसून कोयत्याने वार
केले तर त्यांचा मुलगा जीवन चौधरी यांच्यावर
डेली मार्केट मधील मच्छी मार्केटच्या गेटवर सुमारास काही अज्ञात इसमांनी वार केल्याची घटना २० जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरून रात्री अकरा वाजेच्या सुमारास कोयत्याने वार केल्याची घटना घडली.यामध्ये बेबाबाई लक्ष्मण चौधरी वय ५२ हिच्यावर अज्ञात इसमांनी कोयत्याने गालावर व उजवा हातावर वार करून जखमी केले आहे.प्राथमिक उपचार ट्रामा केअर सेंटर भुसावळ करण्यात आला असून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय जळगांव (सिव्हिल) येथे हलविण्यात आले आहे. तर
डेली मार्केट मधील मच्छी मार्केटच्या गेटवर
जीवन चौधरी उर्फे गोलू (वय ३२) यास गाठून त्यांच्यावर कोयत्याने काही इसमांनी वार केल्याने त्यांची प्रकृती गंभीर असून गोदावरी रुग्णालयात उपचार घेत असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.