शिवसेना वर्धापन दिनानिमित्त भुसावळ शहर शिवसेनेच्या वतीने खास महिलांसाठी शासकीय योजनांचे शिबिर संपन्न


भुसावळ – शिवसेना वर्धापन दिनानिमित्त भुसावळ शहर शिवसेनेच्या वतीने जुना सातारा शिवसेना कार्यालामध्ये खास महिलांसाठी शासकीय योजनांचे शिबिर संपन्न झाले
शहर शिवसेनेच्या वतीने भुसावळ शहरात शिवसेना वर्धापन दिनानिमित्त महिलांसाठी सुकन्या समृध्दी योजना या योजने मध्ये ० ते १० वर्षांपर्यंतच्या मुलींचे पोस्ट ऑफिस मध्ये खाते काढले जाते नागरिकांचा वेळ वाचावा यासाठी शिवसेनेच्या वतीने सर्व पोस्ट ऑफिस मधील स्टाफ शिवसेना कऱ्यालामध्ये उपस्थित होते
या योजने मध्ये मुलींना १५ वर्षापर्यंत पैसे भरावे लागतात ह्या योजनेचे खाते२५० रु मध्ये काढले जाते १८ वर्ष पूर्ण झाल्यावर सुकन्या योजने मधील ५० टक्के रक्कम ही काढता येते २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा लग्नाच्या वेळेस सुकन्या योजनेतील संपूर्ण रक्कम काढता येते या योजने मध्ये कमीत कमी २५० रु तर जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रु आपण जमा करू शकतो
त्याच प्रमाणे भारतीय डाक विभागाचा अपघाती विमा फक्त३९९ रु मध्ये १० लाख रु वार्षिक विमा
या योजने मध्ये ३९९ रु मध्ये महिला व पुरुष या दोघांचा विमा काढला जातो अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रु मिळतात अपघातामध्ये कायमचे अपंगत्व आल्यास १० रु मिळतात
अपघातातील वैदकिय खर्चासाठी आंतर रुग्ण खर्च ६० हजार तर बाह्य रुग्ण खर्च ३० हजार रुपये दिला जातो
अपघत विमा धरकाचा मृत्यू झाल्यास १० लाख रु वातिरिक्त २ अप्त्यांसाठी १ लाख रु शैक्षणिक खर्च दिला जातो
अपघात झाल्यानंतर कुटुंबाला दवाखान्यात नेने साठी२५ हजार रु खर्च दिला जातो व इतर ही बरेच फायदे ह्या योजने मध्ये आहे
तसेच महील सन्मान योजना
या योजनेमध्ये महिला कमीत कमी १००० रु आणि जास्तीत जास्त २ लाख रु भरू शकता
१ वर्षानंतर४० टक्के रक्कम काढू शकता य योजनेत पैसे गुंतवणूक केल्यास इतर बँकापेक्षा व्याज दर जास्त
तरी या उपक्रमात महिलांचा प्रतिसाद मिळाला तर अनेक विद्यार्थ्यांनी शैशनिक कामासाठी आपले कागद पत्रे दिली
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे,राकेश खरारे,स्वप्नील सावळे,नरेंद्र लोखंडे,संदीप पाटील,गोकुळ बाविस्कर,सोनी ठाकूर,दिलीप सुरवाडे, व शिवसैनिकांनी सहकार्य केले