भुसावळात शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शेतकऱ्यांना मोफत बियाण्याचे वाटप :

.
भुसावळ – शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवपूर कन्हाळा, वांजोळा, कुऱ्हा, वराडसीम, साक्री परिसरातील पन्नासहून अधिक गरजू शेतकऱ्यांना कपाशी, उडीद, सोयीबिन हे बियाणे देण्यात आले. तसेच भाताच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सह समन्वयक प्रा.उत्तम सुरवाडे, तालुका प्रमुख संतोष सोनवणे, समाजसेवक मोहम्मद गवळी, उपसरपंच मनोहर चौधरी, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, शहर समन्वयक उमाकांत (नमा) शर्मा, उपशहरप्रमुख राकेश खरारे, शरद जोहरे, शाखा प्रमुख दीपक सूर्यवंशी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना योग्य मदत
हंगामाच्या वेळेस शिवसेनेतर्फे बियाणे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त ही योग्य मदत केली आहे. शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.
शेतकरी हित हेच पक्षप्रमुखांचे धोरण
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी शेतकरी हित जोपासले आहे. गरजूंना मदत हेच शिवसेनेचे धोरण आहे. शेतकऱ्यांना पुढेही खते आणि कीटकनाशके वाटप करणार आहोत असे शिवभोजन संचालक नमा शर्मा यांनी सांगितले.

तसेच शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात वंदनीय पूजनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापति शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करून एकमेकाना पेढे भरवून वर्धापन दिन साज़रा करण्यात आला
या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )सर्व पद अधिकारी यांचेसह
विलास मुड़े,संतोष सोनवने उत्तम सुरवाडे मुकेश गुंजाळ, ललित मुथा , धीरज पाटिल , उमाकान्त शर्मा (नमा) राकेश खरारे गजानन नीले बबलू ब्रहाटे नामदेव ब्रहाँटे सोनी ठाकुर कैलाश लोखंडे नबी पटेल शरद जोहरे यश फालक
सुभाष चौधरी
मक़बूल मेंबर सादिक़ अलीआदी शिवसेनिक उपस्थित होते .