.”त्या”शिक्षकांसाठी खास मीटिंग! .. प्र.ह.दलाल :

भुसावळ – राज्य शासनाने प्राथमिक,माध्यमिक शाळांतील शिक्षकांना २० व ४० टक्के अनुदान जाहीर केले आहे,तथापि TET पास पण अपात्र घोषित शिक्षक मात्र या लाभापासून वंचित ठेवले आहे.राज्यात असे हजारो शिक्षक आहेत.वास्तविक या पैकी अनेक शिक्षक TET पास व अपात्र ठरून त्यांचे वेतन बंद केले होते अश्या शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती निकाल शिक्षकांच्या बाजूने लागला त्यांचे वेतन रोखता येणार नाही असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत तोच न्याय ह्या शिक्षकांना का लागू नाही? ह्या अन्यायाविरुद्ध पुढील वाटचाली बद्दल चर्चा,विचारविनिमय करण्यासाठी अश्या शिक्षकांची एक मीटिंग भुसावळ माध्यमिक पतपेढी येथे शनिवार,दिनांक २४जून रोजी आयोजित केली आहे. सभेला ज्येष्ट शिक्षक नेते प्र.ह.दलाल हे मार्गदर्शन करणार आहेत तरी शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन लोखंडे सर,धुंडले सा,पी जी पाटील सर इ.शिक्षक नेत्यांनी केले आहे.