वरणगांव फॅक्टरीत स्फोटक पावडरचा स्फोट : दोन कामगार जखमी :

वरणगांव – वरणगाव फॅक्टरीत स्फोटक पावडरचा स्फोट होवुन दोन कामगार जखमी झाल्याची घटना घडली असून जखमींवर भुसावळ व बऱ्हाणपूरला खाजगी रुग्णलयात उपचार सुरू आहे .

रविवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास प्राईमिंग सेकशन ला अपघात झाला असुन, प्रशांत पाटील, तळवेल यांचा मणगटा पासुन हात भाजला गेला आहे . .त्यांना आल इज वेल दवाखाना बऱ्हाणपूर ला उपचारा साठी हलवण्यात आले आहे, तर चेतन पाटील यांना रिदम हॉस्पीटल भुसावळ ला उपचारार्थ पाठविले आहे . भा .म संघ , इंटक युनियन , कामगार युनियनचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहे
सध्या सरकार कडून फॅक्टरी खाजगी करणाचा प्रयत्नात काम वाढविण्याचे सत्र सुरु असुन याच कारणामुळे अपघात झाल्याचे समजते .
फॅक्टरी मध्ये कामवाढीसाठी कामगारांवर दबाव दिला जात आहे . सवलती बंद होत आहेत. कोणताही ट्रेडमन चा कुठेही वापर होतोय .
धोक्याच्या विभागा मध्ये सगळे मिक्स कामगार काम करीत आहे . वरीष्ठ स्तरावर याबाबत दखल घेण्याची गरज आहे अशी कामगार प्रतिनिधीची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे .

दरम्यान या आधीही वरणगांव फॅक्टरी मध्ये बऱ्याच घटना घडल्या आहेत मात्र त्या संदर्भात कुठलीही चौकशी करण्यात आली नसून सर्व प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता संजय खन्ना यांच्याकडून करण्यात आला असून रविवार 18 जून रोजी झालेल्या या स्फोटाची संरक्षण मंत्री यांनी सखोल चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी याकरिता सीबीआय चौकशी व्हावी अशीही मागणी संजय खन्ना यांनी केली आहे .