भुसावळ आगाराला ८ लाख १९ हजार रुपये नफा :


भुसावळ : प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एस.टी.चे चाक गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर तोट्यात गेले होते मात्र अलीकडे महिलांना ५० टक्के प्रवासात मिळालेली सवलत तसेच ग्रामीण भागासाठी वाढलेल्या फेर्‍यांमुळे एस.टी.चे तोट्यातील चाक आता नफ्यात आले आहे
भुसावळ आगाराचे उत्पन्न मे २०२३ मध्ये एकूण उत्पन्न दोन कोटी ९० लाख झाले असून गतवर्षी हेच उत्पन्न मे २०२२ मध्ये १ कोटी ८ लाख ९२ हजार इतके होते. आगाराने तोटा भरून काढला असून मे २०२३ मध्ये आठ लाख १९ हजार एव्हढा नफा वाढाल आहे. भुसावळ आगारातील सर्व चालक-वाहक यांत्रिक कर्मचारी व प्रशासकीय कर्मचारी यांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. प्रवासी बांधवांनी महिला प्रवाशांनी एस.टी.महामंडळाच्या बसने प्रवास केल्यामुळे भुसावळ आगाराचा ८ लाख १९ हजार रुपये नफा झाल्याचे आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी कळवले आहे.