भुसावळ – मध्य रेल्वे आरपीएफने अलार्म चेन पुलिंग, बेकायदेशीर तिकीट, अनधिकृत फेरी आणि मद्य आणि तंबाखूजन्य पदार्थांसह प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत आणि दंड आकारून कठोर कारवाई केली आहे.
तपशील पुढील प्रमाणे आहेत:
मे-२०२३ मध्ये:-
• भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अन्वये अनधिकृत अलार्म चेन पुलिंगच्या ९४१ प्रकरणांची नोंद करण्यात आली, ७११ व्यक्तींना अटक करण्यात आली आणि रु.२,७१,२०५/- दंड वसूल करण्यात आला.
• भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये, बेकायदेशीर तिकिटांची ४९ प्रकरणे नोंदवण्यात आली आणि ५२ दलालांवर कारवाई करण्यात आली.
• भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४४(१) अंतर्गत अनधिकृत फेरीवाले २७४१ प्रकरणे नोंदवण्यात आली. २७२९ अनधिकृत फेरीवाल्यांना अटक करून १३,३७,५८०/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
• १,१९,७८०/- किमतीच्या अवैध दारूच्या ३६३ बाटल्या जप्त आणि ४ जणांना अटक.
• ६४ किलो वजनाची आणि ८४,००० रुपये किमतीची अवैध तंबाखू उत्पादनांची १४ पाकिटे जप्त करण्यात आली.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आवाहन:
• इतरांना गैरसोय होण्याच्या अनावश्यक / फालतू कारणांसाठी आलाराम चैन कॉलिंग ACP चा अवलंब करू नका.
• अनधिकृत एजंट / दलाल यांच्याकडून तिकिटे खरेदी करू नका
• अनधिकृत फेरीवाल्यांना प्रोत्साहन देऊ नका.
• ट्रेनमध्ये दारू/प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जाऊ नका
• योग्य तिकीट मिळवा आणि सन्मानाने प्रवास करा
,


