भुसावळ : बाजार समिती सभापती पदासाठी आज निवडणूक झाली. त्यात ठरल्याप्रमाणे सभापतीपदी भाजप प्रणित पॅनलचे अनिल वारके तर उपसभापतीपदी शिवाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. साधारण एक वर्षांसाठी ही निवड असणार असून पाच वर्षात पाच सदस्यांना संधी देण्याचे भाजपाचे नियोजन

आहे तर उपसभापती पदासाठी एका वर्षात दोघांना संधी मिळू शकते.
काही दिवसांपूर्वी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होवून भाजप प्रणित पॅनलने मविआ प्रणित पॅनलचा पराभव करीत 15 जागा पटकावल्या तर तीन जागा अवघ्या मविआला मिळाल्या. निवडणुीकीनंतर सभापती व उपसभापतीपदाबाबत उत्सुकता लागली असताना बुधवारी निवड बिनविरोध झाली.
बुधवारच्या बैठकीत सभापतीपदासाठी अनिल वारके तर उपसभापदीपदासाठी शिवाजी पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच मोठी आतषबाजी करत या निवडीचे स्वागत करण्यात आले. माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी नवनियुक्त सभापती आणि उपसभापती यांचे स्वागत केले.


